• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


थांबा ! १८ नाही तर २१ वय झाल्यावर करता येणार लग्न ; मुलींच्या लग्नाचे वय वाढले


मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले होते.
१५ ऑगस्ट २०२० रोजी लालकिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा उल्लेख केला होता. मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले होते. हे वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आहे. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्पेशल मॅरेज अॅक्ट कायदा आणि हिंदू मॅरेज अॅक्ट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.नीती आयोगामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आलेल्या टास्क फोर्सने मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्याची शिफारस केली होती. विलंबामुळे कुटुंब, महिला, मुलं आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे टास्क फोर्सने अहवालात नमूद केले.


महत्वाच्या बातम्याहवामान