• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकली ‘अनुराधा’


'बॅन लिपस्टिक'चे गुपित आले समोर
औरंगाबाद - मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत अनेक अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत होत्या आणि ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हा नक्की काय प्रकार आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यावरील पडदा उठला असून त्याचे कारण आपल्या समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता लिपस्टिक आणि या वेबसिरीजचा काय संबंध आहे याचे उत्तर या वेबसिरीजमध्येच दडले आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसिरीजचे पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. टिझरमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. हे रहस्य नक्की काय आहे, हे ‘अनुराधा’ पाहिल्यावर आपल्याला कळेल. ‘अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत. आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ‘’ आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल.’’ 'अनुराधा' वेबसिरीजबाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ही वेबसिरीज थोडीशी वेगळी आहे. याचा जॉनर सस्पेंस आणि थ्रिलर असून संजय जाधव सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. यातील नाट्यथरार अंगावर शहारा आणणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजमध्ये नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली. या वेबसिरीजमध्ये लिपस्टिकची नक्की काय भूमिका आहे, यासाठी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेबसिरीज पाहावी लागेल. यातील प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अशा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम वेबसिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी आगामी काळात घेऊन येणार आहोत.''


महत्वाच्या बातम्याहवामान