• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट ! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित


२० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे
‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत आज (१८ डिसेंबर) ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या जबरदस्त टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.या जबरदस्त टीझरमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान उलगडताना दिसत आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका सकारात असून, त्याच्या दमदार अभिनयाने हा टीझर आणखीनच धमाकेदार वाटत आहे. मराठीतील अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार.उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे देखील आता समोर आले आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान