• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


ऐश्वर्या राय-बच्चन हिला ईडीचा समन्स ! जाणून घ्या काय आहे प्रकरण


भारतात पनामा पेपर्समध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा समावेश असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते




अनेक विविध प्रकरणात राजकीय आणि कलाकार व्यक्तीवर कारवाई केल्या नंतर आता बॉलीवूड मध्ये सर्वात मोठे बच्चन कुटुंबाचेही नाव पनामा पेपर लीक प्रकरणी समोर आले होते. ईडीने तेव्हा याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे. भारतात पनामा पेपर्समध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा समावेश असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते. हा गौप्यस्फोट इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोध मोहिमेतून झाला होता. तब्बल ७८ देशातील १०७ पत्रकार संघटनांचा जागतिक शोध पत्रकार समूहात समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्सप्रेसचा देखील समावेश असल्याचे सांगितलं जात होते. मागच्या वेळेस इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य ५०० भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन एक्सप्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश करण्यात आला होता.


महत्वाच्या बातम्या



हवामान