• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


सनी देओलने केला 'गदर २' चा फर्स्ट लुक रिलीज


इन्स्टाग्रामवर सनी देओलने ‘गदर २’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे
सनी देओलच्या गदर चित्रपटाने २० वर्षांपूर्वी प्रचंड प्रेक्षकांची मने जिंकली होती. सोबतच सनी देओलची एक वेगळी प्रतिमा तयार झाली होती. अनेक दिवसांपासून गदर २ येणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. आता ह्या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर २’च्या शूटिंगचे पहिले शेड्युल पूर्ण झाले असून सनी देओलने आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.आपल्या इन्स्टाग्रामवर सनी देओलने ‘गदर २’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. २० वर्षांनंतर ‘तारा सिंग’ किती बदलला हे देखील या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सनी देओल या फोटोमध्ये डोक्याला पगडी बांधून शेकोटीजवळ बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सनीने असे म्हटले आहे की, नशिबवान लोकांनाच आयुष्यातील एक खास व्यक्तीरेखा पुन्हा साकारण्याची संधी मिळते.या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिशा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सनी आणि अमिशाची मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर’ चित्रपटाला जून २०२१ रोजी २० वर्षं पूर्ण झाली होती.चाहत्यांनी ह्या पोस्टला प्रचंड चांगला प्रतिसाद दिला होता. आता सर्वांचे लक्ष हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे यावर चाहत्यांची नजर आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान