• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


मोहम्मद शमीने केले विकेट्स मध्ये दुहेरी शतक ! तोंडले दिगज्ज खेळाडूंचे रेकॉर्ड


कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा पार
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेला पहिला कसोटी सामना चालू आहे. या कसोटीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ३२७ धावा केल्या. मग भारतीय गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत द.आफ्रिकेला १९७ धावांवर लोळवले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने पाच बळी घेतले, तर बुमराह-शार्दुलने प्रत्येकी दोन आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. त्यामुळे भारताला १४६ धावांची आघाडी मिळाली आहे.पाच गोलंदाजांसह खेळणाऱ्या भारताने त्याच तोडीची गोलंदाजी केली.आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावात गुंडाळला. शामीने आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. शार्दुल आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेकडून फक्त टेंबा बावुमाने (५२) अर्धशतक झळकावले. क्विंटन डि कॉक (३४) सोबत बावुमाने केलेली भागीदारी आणि राबाडाने (२५) थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आफ्रिकेला १९७ पर्यंत पोहोचता आले. मोहम्मद शमीने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा पार केला आहे. आर अश्विनचा विक्रम मोडीत काढत शमी भारतासाठी सर्वात कमी चेंडूत २०० बळी घेणारा गोलंदाज ठरला. मोहम्मद शमी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट घेणारा पाचवा जलदगती गोलंदाज ठरला आहे. सर्वात जलद शमीने हे द्विशतक केले.


महत्वाच्या बातम्याहवामान