• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


महात्मा गांधीजीबद्दल अपशब्द बरगळणाऱ्या कालिचरण बाबावर आणि मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल


मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू आणि कालीचरण महाराज यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या गेलेला एक विडिओ सध्या सर्वत्र प्रसारित होत आहे. त्या मध्ये गांधीजी यांची हत्या करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणारे उद्गार कालीचरण बाबाकडून करण्यात आले. त्या ठिकाणी अनेक चिथावणी देणारे भाषण करण्यात आले होते. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्यामुळे यासंबंधी पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली असून समस्त हिंदु आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे मोहनराव शेटे, सामाजिक कार्यकर्ता दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज (रा. अकोला ) कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोषींचे नाव आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान