• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पर्समध्ये आढळले गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रेग्नन्सी किट


प्रेमाचे आणि लग्नाचे अमिष दाखवून तिला अनेकदा घरी नेऊन शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याचेही तिने सांगितले
औरंगाबाद शहरात अल्पवयीन मुलीवर दोन महिन्यांपासून अत्याचार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिताचा आईच्या सजगतेमुळे प्रकार झाला उघडकीस. मुलीच्या पर्समध्ये गर्मभनिरोधक गोळ्या आणि प्रेग्नसी किट मिळाली. तिला विश्वासात घेऊन केली आईनी विचारपूस तेव्हा समोर आला. हा धक्कादायक प्रकार शिकवणीला जात असताना गाडी बंद पडली, तेव्हा अरविंद सदावर्ते याला मदत मागितली तेव्हा गाडी दुरुस्त नाही होणार याचे कारण सांगत आईचा नंबर घेतला. नंतर तिला सतत गप्पा तो करत होता. त्याचे रूपांतर प्रेमसंबधामध्ये झाले. प्रेमाचे आणि लग्नाचे अमिष दाखवून तिला अनेकदा घरी नेऊन शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याचेही तिने सांगितले. तसेच मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले, तिला व्हिडिओ क्लिप दाखवून अरविंद तिला रुमवर नेऊन अत्याचार करत असे. कुणाला सांगितल्यास व्हिडिओ क्लिप व्हायरल करेल, अशीही धमकी देत होता.मुलीचे आई वडील व मित्र मंडळींनी अरविंदच्या घरी जाऊन त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यात अश्लील क्लिप सापडली. अऱविंदने गयावया करून मुलीसोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो गावी गेला. परत येतच नव्हता. अखेर वाळूज पोलिस स्टेशनमध्ये आई-वडिलांनी तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान