• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


KGF ला मागे टाकत 'पुष्पा' चित्रपट ट्रेंड ; तब्बल एवढी केली कमाई


तब्बल १३ दिवसात ४५.५ कोटींची कमाई
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षक पसंती देत ​​आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. तमिळ, तेलगू या साऊथच्या चित्रपटांची क्रेझ आणि लोकप्रियता प्रचंड आहे. पण, हिंदी सिनेविश्वातही साऊथच्या चित्रपटांनाही मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि हे आता सिद्ध झाले आहे. किंबहुना, तेलुगु चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही आपली ताकद दाखवत आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे आणि या चित्रपटाने असा विक्रम केला आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे आणि अल्लू अर्जुनचे स्टारडम सिद्ध केले आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहता यांनी ट्विटरवर माहिती शेअर करताना सांगितले आहे की, कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने इतर दक्षिण हिंदी डब चित्रपटांना मागे टाकले आहे. तर आतापर्यंत KGF हिंदी या यादीत आघाडीवर होता.तब्बल १३ दिवसात ४५.५ कोटींची कमाई पुष्पा चित्रपटाने केला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान