• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


भारत वि. द.आफ्रिका टेस्ट ! सेंचुरियनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय ; वाचा सविस्तर


टीम इंडियाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली
आफ्रिका दौऱ्याची भारतीय संघाने विजयाने सुरवात केली. टीम इंडियाने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने आफ्रिकेवर ११३ धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला १९१ धावांवर रोखले. गावसकर, द्रविड, धोनी यासारख्या दिग्गजांनी या ठिकाणी यश मिळाले नव्हते. यामुळे हा विजय एक ऐतिहासिक ठरला आहे. उपकर्णधार सलामीवीर केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले. केएलने सामन्यातील पहिल्या डावात शतक ठोकलं. केएलने एकूण २६० चेंडूत १३०धावांची खेळी केली. तर शमीने आफ्रिकेच्या पहिल्या डावात ५ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.


महत्वाच्या बातम्याहवामान