• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


विराट द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामान्यातून ; केएल राहुल बनला ३४ वा कर्णधार


विराट कोहली पाठिच्या दुखण्यामुळे खेळणार नाही
भारत वि. द.आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यांत कर्णधार विराट कोहली पाठिच्या दुखण्यामुळे खेळणार नाही ते स्पष्ट झाले. त्यामुळे विराटच्याजागी उपकर्णधार केएल राहुलकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी लोकेश राहुललाच कर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल भारताचा ३४ वा कसोटी कर्णधार आहे. त्यावर तो म्हणाला… “प्रत्येक भारतीय खेळाडूचे देशाचे कर्णधारपद भूषवण्याचे स्वप्न असते. मी याकेड चांगली संधी म्हणून पाहत आहे” असे राहुलने सांगितले. विराट पाठिच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे त्याने सांगितले. “चांगल्या धावा करुन प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. विराटच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान दिले आहे. त्याशिवाय कुठलाही बदल केलेला नाही” असे राहुलने सांगितले.


महत्वाच्या बातम्याहवामान