• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


सध्याच्या पंतप्रधानांना १२ कोटीची कार ! परंतु लाल बहादूर शास्त्री यांनी कर्ज घेऊन घेतली १२ हजार रुपयांची कार


पाकिस्तानसोबत शांतता करारवर सह्या केल्या. त्यानंतर अवघ्या १२ तासांतच त्यांचा मृत्यू झाला
देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून ते आजही प्रत्येक भारतीयाला लक्षात आहेतच. त्यांची पुण्यतिथी ११ जानेवारी रोजी असते. लाल बहादूर शास्त्री यांचं देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातही मोलाचं योगदान होतं. १९५१ साली लाल बहादूर शास्त्री दिल्लीत आले. त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. परिवहन, संचार, उद्योग आणि गृह खातंही त्यांनी सक्षमपणे सांभाळले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री पोलीस आणि परिवहन मंत्री बनले. त्यांनी पहिल्यांदा देशात महिला कंडक्टरची नेमणूक केली होती. शिवाय जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जऐवजी पाण्याची फवारे मारले जावेत, ही कल्पनाही त्यांचीच होती. १९५६ साली तामिळनाडूत झालेल्या एका भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या रेल्वे दुर्घटनेत तब्बल दीडशे लोकांचा मृत्यू झाला होता. श्वेत क्रांती आणि हरीत क्रांतीचे शिल्पकार म्हणूनही लाल बहादूर शास्त्रींकडे पाहिलं जाते. सरकारकडून लाल बहादूर शास्त्री यांनी एक कार देण्यात आली होती.पण त्याच्या घरच्यांनी एकदा हि कार स्वतःचा कामासाठी वापरली मात्र नंतर त्यांना कळल्या त्यांनी चालकाला घरच्यांकडून नंतर पैसे घेण्याचे सांगितले. या नंतर शास्त्री याना कुटूंबियांनी कार घेण्यासाठी हट्ट केला. तेव्हा त्यांनी एक फियाट कार खरेदी केली होती. तेव्हा ती १२ हजार रुपयांची असलेली ही कार घेण्यासाठी पाच रुपये लाल बहादूर शास्त्रींकडे कमी पडले. त्यांच्या फक्त सात हजार रुपये बँकेतील खात्यात होते. त्यामुळे त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून पाच हजार रुपयांचं कर्ज काढलं होतं. दिल्लीतील शास्त्री मेमोरीयलमध्ये हा यादगार किस्सा आजही ठेवण्यात आला आहे.लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू आजही एक गूढ आहे. संशयास्पद मृत्यूबाबत अनेक दंतकंथ आजही ऐकायला मिळतात. मात्र खरं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ११ जानेवारी १९६६ रोजी ताशकंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानसोबत शांतता करारवर सह्या केल्या. त्यानंतर अवघ्या 12 तासांतच त्यांचा मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्री यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. पहिला भारतरत्न पुरस्काराचे मानकरीही लाल बहादूर शास्त्रीच ठरले होते!


महत्वाच्या बातम्याहवामान