• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


औरंगाबादमधील प्रकार ! घर बघायला गेलेल्या वकिल कुटुंबाला विचारली जात ; त्यानंतर ठोकला अट्रोसिटीचा दावा


चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला
औरंगाबाद मधील घटना घर घेण्यासाठी गेलेल्या एका वकिलाच्या कुटुंबाला कामावरील कर्मचाऱ्याने आधी जात विचारली. जात कळाल्यानंतर घर दाखवण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप एका वकिलांनी केला आहे. आमच्या जातीमुळे आम्हाला अशी घृणास्पद वागणूक दिली. असा आरोप सदर वकिलांनी केला. त्यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर बांधकाम साइटवरील कर्मचाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच भाईश्री ग्रुपचे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन, बांधकाम साइटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतरांविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान