• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


कोर्टाचा नितेश राणे यांना दिलासा ; अटक करू नका.........


प्रकरणावर निकाल येत नाही तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करू नये असे आदेश दिले




८ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवसैनिक संतोष परबवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर हा हल्ला केल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर नितेश राणे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे नितेश राणे यांनी कणकवली सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला.उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत याची सुनावणी उद्या घेण्याचे निश्चित केले. तसेच, या प्रकरणावर निकाल येत नाही तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करू नये असे आदेश दिले.


महत्वाच्या बातम्या



हवामान