• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


मराठी पाट्या लावल्याने तरुणांना नोकऱ्या मिळणार आहे का ? खासदार जलील यांचा सरकारला सवाल


त्यावर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केले आहे.
काल बुधवारी (ता.१२) राज्यसरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व आस्थापनावरील नाव आता मराठीतून असणे बंधनकारक असणार आहे. असा निर्णय बैठकीत घेतला गेला आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यावर आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केले आहे. ते ट्विट मध्ये म्हणाले की, असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकरवर केली आहे.पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का? किंवा अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांना त्या बदल्यात काहीही न मिळता फक्त मते द्यायची आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान