• 24 May 2022 (Tuesday)
  • |
  • |


औरंगाबादेत गँगवॉर! ९ जणांनी मिळून केला तरुणाचा निर्घृण खून


हसन पटेल या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला
पूर्ववैमस्यातून औरंगाबादेत ९ जणांनी मिळून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. गँगवॉरमधून हा थरारक प्रकार समोर आला असून मिसारवाडीतील गल्ली नंबर ९ मध्ये ती घडली. या घटनेत हसन पटेल या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन तर जिन्सी पोलिसांनी दोन आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक केली. उर्वरीत पाच जणांचा शोध पोलीस घेत आहे.हसन शनिवारी रात्री मित्राच्या वाढदिवसासाठी बाहेर पडला. नंतर त्याचा मोबाइल बंद झाला. मित्र परिवार त्याला शोधण्यासाठी निघाला. मिसारवाडीत तो एका टपरीजवळ सापडला. तेवढ्यात ९ जणांचे टोळके हसनच्या दिशेने धावत आला. त्यांनी हसनवर सपासप चाकूचे वार केले. गळा, छाती, पोट, मानेवर वार झाल्याने अति रक्तस्राव झाल्याने हसनचा जागीच मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अश्या प्रकारे त्याचा खून करण्यात आला.


महत्वाच्या बातम्याहवामान