• 23 May 2022 (Monday)
  • |
  • |


गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल


दर्शन यांना कोणतीही कल्पना न देता त्यांचा चित्रपट युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे
चित्रपट दिग्दर्शन सुनील दर्शन यांच्या तक्रारीवरून कॉपीराईट कायद्यांतर्गत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सुनील दर्शन ते तक्रारीत म्हणतात कि, गुगलने आपल्या अधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ यु-ट्युबवर अपलोड करण्याची अनुमती दिली होती.’ त्यांच्या या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपीराईटच्या प्रकरणासंदर्भात सुनील दर्शन यांनी कोर्टात धाव घेतली होती.२०१७ मध्ये त्यांचा ‘एक हसीना थी एक दिवाना था’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दर्शन यांना कोणतीही कल्पना न देता त्यांचा चित्रपट युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. असा आरोप करत त्यांनी कोर्टात धाव घेतली. मुंबईतील एका कोर्टाच्या निर्देशानुसार गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्याच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायदा १९५७ च्या कलम ५१, ६३ आणि ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे.

हवामान