• 25 June 2022 (Saturday)
  • |
  • |


बीसीसीआय ने केले २ वर्षासाठी 'या' पत्रकाराला बॅन


ऋद्धिमान साह याच्या तक्रारीनंतर बीसीसीआय कडून कठोर कारवाई




पत्रकार बोरिया मजूमदार यांना बीसीसीआयने २ वर्षाचा बॅन केले आहे. क्रिकेटपटू ऋद्धिमान साह याच्यासोबत वाद झाल्यानंतर बीसीसीआय कडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. ऋद्धिमान साहाकडे पत्रकार बोरिया मजूमदार यांनी मुलाखतीसाठी वेळ मागितला होता. मात्र साहाने या मागणीचं कोणतही उत्तर बोरिया मजूमदार यांना दिलं नाही. यावर नाराज होत बोरिया यांनी साहाला मेसेज केले होते. या मेसेजचे स्क्रिन शॉट ऋद्धिमान साहा याने आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले होते. पत्रकार बोरिया मजूमदार यांनी आपल्या मेसेजमध्ये लिहलं होतं की, "माझ्या सोबत इंटरव्यू करणं खूप चांगलं असेल; ते एका यष्टीरक्षकाची निवड करतात जो सर्वोत्तम असतो. पण तुम्ही ११ पत्रकार निवडण्याचा प्रयत्न करता. हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तुम्ही अशा व्यक्तीला निवडा जो तुमची मदत करेल" इतकं बोलून बोरिया थांबले नाहीत तर पुन्हा एक मेसेज केला. त्यात ते म्हणतात. "तू फोन नाही केलास; मी पुन्हा कधीच तुझी मुलाखत घेणार नाही, मी अपमान सहन करत नाही. हे माझ्या नेहमी ध्यानात असेल. तू असं करायला नको होतं" ऋद्धिमान साहने हा घडला प्रकार ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. या नंतर अनेत दिग्गज क्रिकेटपटुंनी मजूमदार यांच्या या कृत्याचा निषेध नोंदवला आणि मजूमदार यांच्यावर कारवाईची मागणी देखील केली. शेवटी बोरिया मजूमदार वर कारवाई करत दोन वर्षांसाठी बॅन केले आहे. या दोन वर्षाच्या काळात बोरिया मजूमदार देशात BCCI कडून खेळवली जाणारी कोणतीही अंतरराष्ट्रीय अथवा डेमेस्टिक मॅच कव्हर करु शकणार नाहीत. इतकच नव्हे तर ते क्रिकेटच्या स्टेडिअममध्ये एंट्री देखील करु शकणार नाहीत.


महत्वाच्या बातम्या



हवामान