• 25 June 2022 (Saturday)
  • |
  • |


सावधान ! रोजच्या आहारात येणाऱ्या 'या' पदार्थामुळे होऊ शकतो कर्करोग


रोज खाल्ल्या जाणार्‍या दूध, दही यांसारख्या हेल्दी पदार्थांमुळेही कर्करोग होऊ शकतो.
कर्करोग म्हणजे कॅन्सर हा प्राणघातक आणि भयंकर परिणामकारक आजार आहे. कॅन्सर होण्याचे अनेक कारणं आहेत. त्यात कॅन्सरची अनेक कारणे असली तरी तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळेही कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अनेकदा असे मानले जाते की दारू पिणे, तेलकट पदार्थ खाणे, मीठ आणि मसाल्यांचे अतिसेवन यांमुळे कर्करोग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, कर्करोग हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.रोज खाल्ल्या जाणार्‍या दूध, दही यांसारख्या हेल्दी पदार्थांमुळेही कर्करोग होऊ शकतो. मासे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि प्रोटिनसारखे असंख्य पोषक तत्व असतात. पण जर तुम्ही खारवलेले मासे खाल्ले तर तुम्हाला कर्करोगाचा धोका होऊ शकतो. सॉल्ट फिश म्हणजे मीठ लावून दीर्घकाळ टिकवलेले किंवा साठवलेले मासे होय. ही पद्धत आशिया आणि चीनमध्ये वापरली जाते. ही पद्धत कार्सिनोजेनिक गुणधर्म निर्माण करू शकते, ज्यामुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. दूध, पनीर आणि दही हे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रथिने आणि कॅल्शियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. पण काही दुग्धजन्य पदार्थ प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. २०१४ च्या एका अहवालानुसार, दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने IGF-1 ची पातळी वाढते. हे प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित आहे. मका हे एक असं अन्नधान्य आहे जे खाल्ल्याने अगणित आरोग्यदायी फायदे होतात. पण जेव्हा ते मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न बनवण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्यातील पीएफओए नावाच्या घटकापासून स्वादुपिंड, मूत्रपिंड, यकृत आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. पॉपकॉर्न हा एक हेल्दी स्नॅक्स आहे पण तो नेहमी घरच्या घरीच बनवला पाहिजे. बटाटा हा कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस यासारख्या घटकांचा खजिना आहे. पण जेव्हा ते चिप्सच्या स्वरूपात खाल्ले जाते तेव्हा ते कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. बटाट्याच्या चिप्समध्ये असलेले मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट शरीरासाठी चांगले नाही. त्यात ऍक्रिलामाइड असते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. लाल मांस हे लोह, व्हिटॅमिन बी12, झिंक आणि प्रथिने यांसारख्या घटकांचा खजिना आहे. याच्या सेवनाने स्नायूंचा विकास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. मात्र, याच्या अतिसेवनाने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आठवड्यातून ६५-१०० ग्रॅमपेक्षा अधिक शिजवलेले लाल मांस खाऊ नये. टीप : - वरील लेख माहिती साठी आहे. उपचारासाठी १००% हा पर्याय नसू शकतो, त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.


महत्वाच्या बातम्याहवामान