नोकरीची संधी : अॅमेझॉन' मध्ये तरुणांना मिळणार 1300 नोकऱ्या

नवी दिल्ली- अॅमेझॉन भारतासह जगातील अनेक देशांतून पात्र उमेदवारांची भरती करणार असून त्यात भारतात सर्वात जास्त नोकऱ्या असतील। ही कंपनी भारतात अॅमेझॉन ई-कॉमर्स व क्लाऊड बिझनेसशिवाय पेमेंट्स, कंटेंट (प्राइम व्हिडिओ), वॉइस असिस्टन्स...



नवी दिल्ली- अॅमेझॉन भारतासह जगातील अनेक देशांतून पात्र उमेदवारांची भरती करणार असून त्यात भारतात सर्वात जास्त नोकऱ्या असतील। ही कंपनी भारतात अॅमेझॉन ई-कॉमर्स व क्लाऊड बिझनेसशिवाय पेमेंट्स, कंटेंट (प्राइम व्हिडिओ), वॉइस असिस्टन्स (अलेक्सा), फूड रिटेल व कस्टमर सपोर्ट आदी क्षेत्रांत स्वत:चा विस्तार करतेय। त्यामुळे या नोकऱ्या निर्माण होतील। २०१८ च्या अखेरपर्यंत अॅमेझॉनने भारतात ६० हजार लोकांना नोकऱ्या दिल्या असून हे प्रमाण जगातील कंपनीच्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत १० % आहे हे विशेष। या वर्षी बहुतांश भरती प्रक्रिया बंगळुरू, हैदराबाद व चेन्नईत होईल। सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट अँड मार्केटिंग, मशीन लर्निंग, क्वालिटी एश्योरन्स, वेब डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सप्लाय चेन, कंटेंट डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, स्टुडिओ-फोटोग्राफी आदी क्षेत्रांत भरती करेल।

हवामान