मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या ऐनतोंडावर ठिकठिकाणी रोकड सापडल्याच्या घटना घडत आहे. याच हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग अलर्ट मोडवर आहे.येत्या सोमवारी २० मे रोजी लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा ५ वा टप्पा सुरु होण्यापूर्वीच ,सफाई कामगार रेश्मा म्हस्के यांना १३ मे रोजी चेंबूर मधील सहकार नगर येथील विना सेरेनीटी इमारतीत १० व्या मजल्यावर निवडणुकीच्या सात दिवसापूर्वी १७ लाख रुपयांची रोकड सापडल्याची घटना समोर आली आहे.त्यानंतर रेश्मा म्हस्के यांनी त्वरित अर्बनक्रुव एच के अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट चे पर्यवेक्षक वर्षा खरात यांना कळवल.त्या बॅग मध्ये सर्व ५०० च्या नोटा होत्या,वर्षा खरात यांनी ही पैश्याची बॅग तात्काळ इमारतीतील कार्यकारणी सदस्या कडे सुपूर्त केली त्याबद्दल त्या दोन्हीही प्रामाणिक महिलेचे कौतुक होत आहे.
इमारतीच्या सदस्यांनी मिळालेली पैश्याची बॅग ताब्यात घेऊन इमारतीच्या कार्यालयातील लॉकर मध्ये ठेवली आणि सायकाळी एक बैठक घेऊन चर्चा केली.त्यानंतर १०० क्रमंकावर संपर्क साधून या संदर्भात माहिती देण्यात आली.काही वेळातच पोलीस घटनस्थळी पोहचली व त्यानंतर नेहरू नगर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चलचित्राची तपासणी ही केली. तपासामध्ये कोणत्याही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नाही.बॅगेत १६ लाख ७७ हजार ५०० रुपये होते. ही रक्कम कुणाची आहे, तसेच कोठून आणली असे विचारल्यास या बाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.