आजकाल मोबाईल हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. मोबाईल वापरण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.
काही लोकांना मोबाईलचे इतके व्यसन असते की ते झोपताना देखील उशीजवळ घेऊन झोपतात. रात्री फोन कॉल, मेल आणि मेसेज चेक करण्यासाठी अनेकजण रात्रीच्यावेळी ही मोबाईलजवळ ठेवतात. त्यामुळे दिवसाचा शेवट आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात अनेकांची मोबाईलवरुनच होते.
फोनमुळे तुमची झोप उडवण्यासोबतच तुम्हाला तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. जसे की, मोबाईल फोन उशीजवळ घेऊन झोपल्याने तुमच्या आरोग्याला हानी तर होतेच पण कॅन्सरचा धोकाही वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक वेळा सकाळी उठल्यावर तुमचा मूड खराब होतो, हे देखील मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होते. तसेच यामुळे डोकेदुखी, मज्जातंतुवेदना आणि इतर आरोग्यासंबंधीत आजारांचे मूळ कारण मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आहेत.
मोबाईल रेडिएशनमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. मोबाईलमधील रेडिएशनमुळे तुम्ही इरेक्टाइल डिसफंक्शनला बळी पडू शकता. त्यातील रेडिएशनचा परिणाम बॉडी क्लॉकवरही होतो. या सर्व सामान्य समस्या आहेत? पण जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, मोबाईल फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या विशेष प्रकारच्या रेडिएशन, ज्याला आरएफ रेडिएशन म्हणतात, ज्यामुळे0 कर्करोगाचा धोका वाढवते. त्यामुळे मोबाईल जवळ झोपताना काळजी घ्या.
मोबाईल उशीजवळ ठेवण्याचे दुष्परिणाम
जर तुम्ही रात्री झोपताना तुमचा मोबाईल जवळ घेऊन झोपलात, तर वेळीच सावध व्हा. कारण मोबाईल फोन सतत रेडिओ फ्रिक्वेन्सी सोडतात. ज्याचे तुमच्या मनावर आणि शरीरावर वाईट परिणाम होतात. काही बदल गंभीर आजारांना कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. मॉर्निंग वॉक करताना मोबाईल दूर ठेवा. रात्रीच्या वेळी मोबाईलचा अतिवापर केल्याने तुम्हाला दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि निराशा वाटू शकते. फोनमधून येणाऱ्या हानिकारक लहरींच्या विपरीत परिणामांमुळे अल्झायमरसारखे विकार होऊ शकतात. जोखीम किंवा स्वत: ची बाधा झाल्यामुळे कर्करोग किंवा इतर घातक रोग होण्याचा धोका होऊ शकतो. रात्री तुमचा फोन उशीजवळ ठेवल्याने तुमच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे निद्रानाश आणि इतर मानसिक आजार होऊ शकतात. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही.