बीड दि.१८ (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव २०२३ निमित्त सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाला भीमाच्या लेकरांची गर्दी उसळलेली पहावयास मिळाली.यावेळी उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता.
या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे दैनिक झुंजार नेताचे संपादक अजित वरपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायिका वैशाली माडे यांनी विविध भीम गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले तर समोर उपस्थित तरुण तरुणींनी जल्लोषात गाण्यावर ठेका धरत मनमुराद आनंद घेतला,भीमराज का बेटा मै हु जय भीम वाला हु असे म्हणत डॉ योगेश भैय्या आणि डॉ सारिका यांनी गाण्यात सहभाग घेतला,दोन तास सुरू असलेल्या कार्यक्रमात शेवट कधी झाला ते कळलेच नाही शेवटी जयघोष करत कार्यक्रमाचा समारोप झाला
प्रारंभी गायिका वैशाली माडे म्हणाल्या की बीडच्या रसिकांची ओढ काही वेगळीच आहे गेल्या वर्षी मी याच शहरात आले होते तेव्हा रसिकांनी भरभरून दाद दिली होती आजही डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मला आपल्यासमोर गायनासाठी निमंत्रित केले आहे बीडकरांची दाद ही माझ्यासाठी वर्षभर आठवणीत राहते डॉ योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बीडच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी केलेल्या कार्याची हीच ती पावती आहे अशा युवा नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम आपण करावे असे सांगून त्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना आवाहन केले,डॉ सारीका क्षीरसागर यांच्यामुळे नवोदित कलाकारांना भव्य व्यासपीठ उपलब्ध होते हे कलाकारांचे भाग्य असल्याचे त्या म्हणाल्या त्यांच्या या बोलण्याला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून रसिकांनी दाद दिली.