शहापूर/ प्रतिनिधी — शहापूर तालुक्यातील साठगाव येथील रहिवासी असलेल्या अंजना तानाजी उबाळे ह्या भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त कार्यालयात सळग ३१ वर्षे चतुर्थ श्रेणी पदावरून आपली सेवा करून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साठगाव या आयोजित करण्यात आला होता.त्यांचे पती तानाजी उबाळे हे पोलीस खात्यात असताना त्यांचे निधन झाल्याने अनुकंपा धोरणानुसार अंजना उबाळे यांना पोलीस खात्यात नोकरी मिळाली होती. त्यांनी त्यांची सेवा उत्तम प्रकारे बजावली.त्याच्या सेवेच्या कामगिरी बद्दल ठाणे पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मधुकर उबाळे,भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा हिशोब तपासनीस भरत घनघाव , धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष अविनाश थोरात ,जेष्ठ पत्रकार बी.डी. गायकवाड, पत्रकार अविनाश उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मारुती चन्ने , डॉ. बी.बी. प्रधान, कुमार उबाळे, गोविंद विशे, लक्ष्मण विशे, दीपक गायकवाड,मनोहर गायकवाड,भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी, साठगाव गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भीमाई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य मनोज गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार घनश्याम गायकवाड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.















