• 26 July 2021 (Monday)
  • |
  • |

राग आवरासप्ताहातला रवी शनी योग आपल्याला फार सुधरू देणार नाही. नित्य व्यवहार तसे चालू राहतील. पण मोठय़ा फायद्याच्या अपेक्षेत न राहिलेले बरे. मुलाचा किंवा मित्राचा एखादा प्रश्न किंवा त्यांची एखादी चूक भलतीच भोवणार आहे. रागाच्या कक्षा मोठय़ा होणार आहेत. पण लक्षात ठेवा क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम:। (२.६३) राग आल्याने संमोह म्हणजे मूढता येते. त्यातून महत्त्वाच्या चांगल्या गोष्टींची आठवण राहात नाही आणि मग बुद्धिनाश होतो. अर्थातच ही गोष्ट अनेक नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. सप्ताहातल्या काही चांगल्या गोष्टींचा आनंद घेताना हेही गोष्ट लक्षात घेतल्यास आपल्याला मिळणारा आनंद हा निखळ असेल. मधुमेह, रक्तदाब व त्वचाविकार असेल तर सावध! वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही शब्दांमुळे मोठे घोळ होणे शक्य. शुभ दिनांक : ५, ६. महिलांसाठी : कामातली धरसोड टाळा.