• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


द. आफ्रिकेतील नव्या विषाणूचे सावट राज्यात लागू शकतात पुन्हा निर्बंध ?


पुण्यातील परिस्थितीबाबत सांगताना पवारांनी महत्त्वाची माहिती देण्यासह निर्बंध घालावे लागू शकतातकोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देश मागील बऱ्याच काळापासून उपाय-योजना सुरु आहेत. लसीकरण जगभरात मोठ्या प्रमाणात चालू आहे. भारतातर युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. पण आता नवीन एक टेन्शन सर्वत्र पसरलेले आहे. दक्षिण आफ्रिका देशात एक नवा कोरोना व्हेरियंट जन्माला आल्याने सर्व देशाचे टेन्शन वाढले आहे. नव्या उपाययोजनां घेऊन प्रशासन सज्ज झालं असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत पुणेकरांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.पुण्यातील परिस्थितीबाबत सांगताना पवारांनी महत्त्वाची माहिती देण्यासह निर्बंध घालावे लागू शकतात, तसंच परिस्थिती पाहून पुढील उपाययोजना आखल्या जातील असंही म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसोबत ऑनलाईन बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या बातम्या
हवामान