• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


मार्च मध्ये होणार महाराष्ट्र निर्बंध मुक्त ?


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता वर्तवली



देशासह राज्यतील कोरोनाचा उद्रेक बराच कमी होतांना दिसत आहे. काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मार्चपासून राज्यात निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक उपाय योजना बंधनकारक राहील असे ते म्हणाले. कोविडची रोजची नवीन प्रकरणे कमी झाल्यानंतर आणि तिसऱ्या लाटेचा वेग कमी झाल्यानंतर मार्चपासून निर्बंध शिथील केले जाऊ शकतात असे टोपे यांनी सांगितले.राजेश टोपे यांनी केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्राचा संदर्भ दिला.आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘पत्रात केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की सर्व राज्यांनी निर्बंध कमी करावेत आणि लसीकरणासोबतच लोकांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास प्रोत्साहन द्यावे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे सुरू ठेवावे. महामारीच्या काळात आपण अशी निर्बंध त्वरित थांबवू शकत नाही. परंतु निर्बंध कमी करण्याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेईल’, असे टोपे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान