• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


युक्रेन - रशिया युद्धाचे मोठे पडसाद देशात होणार महागाईचा भडका !


प्टेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $१०० वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आ



रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आणि युक्रेनवर हल्ले चढवलेत. मात्र, या युद्धाचा परिणामामुळे भारतात मोठे पडसाद उमटणार आहेत. युक्रेन - रशियाच्या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते, अशी शक्यता आहे. कच्चे तेल आणि सोने महाग होण्याची शक्यता अधिक आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि युद्धाची शक्यता यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $१०० वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु झाल्यास कच्चे तेल आणखी महाग होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.२०२२ मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज खरा ठरला आहे, असे Goldman Sachs ने म्हटले होते. त्यावेळी, जे. पी. मॉर्गनने २०२२ मध्ये प्रति बॅरल १२५ डॉलर आणि २०२३ मध्ये प्रति बॅरल १५० डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.कच्च्या तेलाच्या किमती पेटल्या आहेत. २०२२ मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. १ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ६८.८७ डॉलर होती. जे आता प्रति बॅरल १०० डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान