• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम ! खाद्यतेलामध्ये २० ते २५ रुपयांनी वाढ


१५ दिवसांमध्ये खाद्य तेलाच्या किमती प्रति लिटर मागे २० ते २५ रुपयांनी वाढल्या आहेतगेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशाच्या युद्धाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. रशिया हि सर्वाधिक पेट्रोल,तेल, गॅस पुरवणारा देश असल्यामुळे जगात सर्वत्र महागाईचा भडका उडणार हे काही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. आता या युद्धाला आठ दिवस झाले असून याचा परिणाम आता सगळीकडे जाणवून येत आहे. युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असून, प्रति बॅरल ११८ डॉलरवर पोहोचले आहेत. दरम्यान दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या १५ दिवसांमध्ये खाद्य तेलाच्या किमती प्रति लिटर मागे २० ते २५ रुपयांनी वाढल्या आहेत. सोयाबीन, सुर्यफूल, शेंगदाना अशा सर्वच तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मोहरीच्या तेलाने तर दोनशे रुपयांचा टप्पा पार कला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाची पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने येणाऱ्या काळात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.भारतात सरासरी 65 टक्के तेलाची आयात केली जाते. पाम ऑईल आपण इंडोनेशियाकडून आयात करतो. जवळपास साठ टक्के पाम ऑईल एकटा इंडोनेशिया भारताला पुरवतो. तर सुर्यफूल तेल आपण रशिया आणि युक्रेनकडून आयात करतो. यातील जवळपास सत्तर टक्के सुर्यफूल तेलाची आयात आपण युक्रेनकडून करतो. तर वीस टक्के सुर्यफूल तेलाचा पुरवठा आपल्याला रशियाकडून होतो. तर दहा टक्के तेल आपण आर्जेंटिनाकडून आयात करतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. तेलाचा पुरवठा होत नसल्याने तेलाचे दर वाढले आहेत. येत्या काळात तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या
राजकीय

आरोग्य

हवामान