• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


देशात काल ४१८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १०४ जणांचा मृत्यू


कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १५ हजार ४५९



नवीन वर्षाच्या सुरवातीला देशात मोठ्या प्रमाणात सर्वत्र रुग्णाची वाढ झाली. ती तिसरी लाट असल्याचे सांगितले होते. त्यांनतर मार्चच्या सुरवातीला हि संख्या अचानक कमी होऊ लागली होती. देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने कमी होत असल्यामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. देशात काल दिवसभरात ४१८४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १०४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४४,४८८ एवढी झाली आहे. बुधवारी ४ हजार ५७५ नवीन बाधितांची आणि १४५ मृत्यूची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज बाधितांची संख्या कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४४ हजार ४८८ ने कमी झाली आहे. देशात लसीकरण मोहित मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १७९ कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात १८ लाख २३ हजार ३२९ डोस देण्यात आले. आतापर्यंत १७९ कोटी ५३ लाख ९५ हजार ६४९ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान