• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


देशाला मिळाल्या नव्या राष्ट्रपती, रचला इतिहास


१५ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी देशाला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती



आज संपूर्ण देशाचे लक्ष राष्ट्रपती निवडणुकीकडे लागले होते. देशाला आज नवीन राष्ट्रपती मिळणार होते.या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना ५४० मतं मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतके होते. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली होती, त्यांच्या मताचे मूल्य हे १,४५,६०० इतके होते. दुसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना १३४९ मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली. सर्व राज्यांतील मतमोजणी झाल्यानंतर अखेर मुर्मू यांना ५ लाख ७७ हजार ७७७ इतकी मतं मिळाली. विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान