• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


उद्या होणार मंत्री मंडळ विस्तार ? वाचा संभाव्य मंत्र्यांची यादी


मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर



महाराष्ट्रात अभुतपुर्व गोंधळ घडल्यानंतर आता नवीन सरकार स्थापन झाले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास २२ दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल. आता हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो. भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते? १.चंद्रकांत पाटील, २.सुधीर मुनगंटीवार, ३.गिरीश महाजन, ४.राधाकृष्ण विखे पाटील, ५.आशिष शेलार, ६.प्रवीण दरेकर, ७.चंद्रशेखर बावनकुळे, तर शिंदे गटाकडून १.गुलाबराव पाटील, २.उदय सामंत, ३.दादा भुसे, ४.शंभूराज देसाई, ५.अब्दुल सत्तार यांना संधी मिळू शकते.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान