• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली रतन टाटा यांची भेट,वाचा पूर्ण


मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली टाटा यांना सदिच्छ भेट



देशातील सर्वात मोठे उद्दोगपती रतन टाटा यांची आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी काही वेळ चर्चा सुद्धा केली. बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे. निर्णयांच्या स्थगितीबाबत यावेळी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, जी कामं ठाकरे सरकारच्या काळात शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली त्यांना स्थगिती दिली. अत्यावश्यक कामांना स्थगिती नाही. सरकार बदलले म्हणून लोकविकासाची काम कुठलीही रद्द होणार नाहीत. अत्यावश्यक जी कामं आहेत ती रद्द होणार नाहीत, चुकीच्या पद्धतीने जी कामं झाली त्यावर मात्र नक्की विचार केला जाईल. घाईघाईने केलेली काम आहेत त्यांना स्थगिती दिली आहे. अधिकाऱ्यांचा काहीही प्रश्न नाही, माझी त्यांच्याशी बैठक झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान