• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, नावांवर सुद्धा झाला शिक्कमोर्तब ?


शुक्रवारी २९ जुलैला होणार मंत्रीमंडळ विस्तारराज्यात अभुतपुर्व गोंधळ घडल्यानंतर आता राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले आहे. नवीन सरकार येऊन सुद्धा अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या सरकार मध्ये शपथ घेऊन आज जवळपास २५ दिवस उलटले. मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघे राज्य आणि सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या विस्ताराला अखेर शुक्रवारी म्हणजे 29 जुलैचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज रात्री ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळाची यादी निश्चित होऊन शुक्रवारी विस्तार केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते? चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार प्रवीण दरेकर चंद्रशेखर बावनकुळे शिंदे गटाकडून कुणाला मिळू शकते संधी? गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई अब्दुल सत्तार यांना संधी मिळू शकते


महत्वाच्या बातम्या
राजकीय

आरोग्य

हवामान