• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


शिंदे सरकारकडून घेण्यात आले सामन्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर


आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले निर्णयराज्यात राजकीय धुमाकूळ सुरू असताना आता शिंदे सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जफेडीपासून ते दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर ३ नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार, ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थीना जागा देण्यासाठी विविध सवलती देणार, लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता, दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणार आणि अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. या निर्णयात, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार इन्सेन्टिव्ह दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी वगळले त्यांनाही ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार ६ हजार कोटी तिजोरीतून देणार आहे. त्याचा १४ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच तीन वर्षाची कर्ज फेडीची मुदत होती. ती दोन वर्ष करण्यात आली आहे. वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी ३९ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याचा १ कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होणार. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला मीटर घेण्यसााठी चार्ज घेतले जाणार नाही. उपसा जलसिंचन योजनेतील. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांकडून २ रुपये १६ पैसे वीज दरानुसार रक्कम आकारली जात होती. तो एक रुपया १६ पैसे केला. म्हणजे प्रति युनिट एक रुपया सवलत दिली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांना मोठा फायदा होईल. मुंबई, मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागातील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील. यासाठी तत्काळ आणि दीर्घ टप्प्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे महत्त्वाचे निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या
राजकीय

आरोग्य

हवामान