• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ! बारावीच्या पुरवणी परीक्षेत बदल


सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळ जाहीरराज्याच्या बारावीचा निकाल लागून एक महिना झाला आहे. जेव्हा निकालाच्या दिवशीच पुरवणी परीक्षेची माहिती देण्यात आली होती. आता याचसंदर्भात मोठी बातमी आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेत थोडे बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये होत असलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेलं आहे. बारावीच्या व्यावसायिक द्विलक्ष्यी अभ्यासक्रम पेपर एक आणि दोन विषयांच्या ६,१० आणि १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले. परीक्षेच्या तारखांबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या ‘www. mahahsscboard.in‘ या अधिकृत संकेतस्थळावर 1 ऑगस्ट, उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


महत्वाच्या बातम्या
राजकीय

आरोग्य

हवामान