• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


सदाशिव पाटील मरतोळीकर यांची संभाजी ब्रिगेड मरखेल सर्कल प्रमुख पदी निवड


देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालुक्यातील मरतोळी येथे नुकतेच संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे अनावरण मोठ्या उत्सवात पार पडले. ५ ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर मरतोळी येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखेची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे व विधानसभाध्यक्ष अँड.अंकुशराजे जाधव यांच्या हस्ते शाखेची उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदाशिव पाटील मरतोळीकर यांची मरखेल सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली.



देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालुक्यातील मरतोळी येथे नुकतेच संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे अनावरण मोठ्या उत्सवात पार पडले. ५ ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर मरतोळी येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखेची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे व विधानसभाध्यक्ष अँड.अंकुशराजे जाधव यांच्या हस्ते शाखेची उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदाशिव पाटील मरतोळीकर यांची मरखेल सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली. संभाजी ब्रिगेडची गाव तेथे शाखा स्थापन करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील पदाधिकारी संभाजी ब्रिगेडची विचारसरणी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहोरत्र कार्य करत आहेत. संभाजी ब्रिगेडच्या विचाराशी व कार्याशी एकरूप असलेल्या मरतोळी येथे शाखा स्थापना करून संभाजी ब्रिगेडच्या विचाराची देवाण-घेवाण व संघटनेचे कार्य येथील तळागाळापर्यंत रुजवण्याचे काम तालुक्यातील पदाधिकारी करत आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे, विधानसभाध्यक्ष अँड.अंकुशराजे जाधव, जगदिश जाधव, देविदास थडके, संतोष चिद्रावार, शिवकुमार फुलारी, गणेश भुताळे झरीकर, दत्ता बिरादार लोणीकर यांच्यासह मरतोळी येथील सरपंच भाऊसाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील, उपसरपंच मनोज गिरी, चेअरमन राजेंद्र पाटील व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान