• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


....शेतकऱ्यांनी जाळला ऊस

तुमसर : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता ऊस उत्पादक शेतकरी किडीमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे हे शेतकरी...



तुमसर : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता ऊस उत्पादक शेतकरी किडीमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे हे शेतकरी शेतातील उभे ऊसपीक आगीच्या हवाली करीत आहेत. तुमसर तालुक्यातील परसवाडा (सि) परिसरातील शेतकऱ्यांनी २० एकरातील ऊस पिकाला आगी लावल्या आहेत. नगदी पीक अशी ओळख असलेले ऊसपीक जाळत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परसवाडा (सि) परिसरातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून १० ते १२ वर्षापासून ऊसाची लागवड करीत आहेत. या हंगामात धान पिकावर किडीने हल्ला केल्याने धान फस्त झाले. अशातच ऊस पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीने उभे पीक कवेत घेतले आहे. परिणामी पिकाची वाढ झाली नाही. केवळ ऊसाचे धांडे तेवढे शेतात शिल्लक आहे. नाईलाजाने ऊस उत्पादक शेतकरी मारोती ठाकरे यांनी शेतातील उभे ऊसाच्या पिकाला आग लावली. ऊस लावण्याचा खर्च येथे निघत नाही. ऊसाला किडीने आतून पोखरून टाकले. त्यामुळे संपूर्ण शेतात आग लावल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कमालीच्या चिंतेत सापडले आहेत. ऊस लागवडीला मोठा खर्च येतो. तो निघत नसेल तर काय करावे? असा प्रश्न शेतकड्ढयांना पडला आहे. ऊसाला आग लावण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. परसवाडा येथील शरद हिवरकर, यादोराव ठाकरे, ललीत तरटे या शेतकऱ्यांनी ऊस पिकाला आगी लावल्या आहेत. ऊसाला पायरीलीया तथा किडीने ग्रासले आहे. कृषी विभागाने प्रत्यक्ष बांधावर अजूनपर्यंत भेटी दिल्या नाही व मार्गदर्शन केले नाही, अशी तक्रार तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी कृषी मंत्र्याकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने धान पिकाप्रमाणे ऊस शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना सावरण्याची गरज आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान