एमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प, 10 मेट्रो प्रकल्पांसाठी 7 हजार 400 कोटी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १४७ व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रुपये १६ हजार ९०९.१० कोटींचा अर्थसंकल्प २०१९-२० साठी मंजूर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध...मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १४७ व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रुपये १६ हजार ९०९.१० कोटींचा अर्थसंकल्प २०१९-२० साठी मंजूर केला. या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकल्पांसाठी महत्वपूर्ण अशी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महत्वकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तरतूद करण्याप्रमाणेच दादर येथील इंदू मिल कम्पाऊंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व दादर येथीलच महापौर बंगल्याच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पामध्ये रूपये २१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १० मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद १० मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये रूपये ७ हजार ४८६.५० इतकी तरतूद आहे. यामध्ये मेट्रो भवनासाठीची रूपये १०० कोटीची तरतूदही आहे. विविध मेट्रो प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद अशी – वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ (रू.९८ कोटी); दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो-२अ (रू.१ हजार ८९५ कोटी); डी.एन.नगर ते मंडाले मेट्रो-२ब (रू.५१९.६० कोटी); कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ (रू.६५० कोटी); वडाळा ते कासारवडावली मेट्रो-४ (रू.१ हजार ३३७ कोटी); ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ (रू.१५० कोटी); समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो-६ (रू.८०० कोटी); अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ (रू.१ हजार ९२१ कोटी); गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो-१० (रू.५ कोटी); वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-११ (रू.५ कोटी) आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-१२ (रू.५ कोटी). पारबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये आरे येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनासाठी रूपये १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या भवनात प्रशिक्षण केंद्र, मेट्रो संचलन व नियंत्रण केंद्र, कार्यालये, कॅफेटेरिया प्रमाणेच सात रहिवासी मजले असणार आहेत. मुंबई आणि महानगर प्रदेशातील १३ मेट्रो मार्गाचे संचलन व नियंत्रण या मेट्रो भवनातून होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांसाठी भरघोस अशी तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर प्रकल्पासाठी रूपये ३ हजार कोटी तर बहुद्देशीय मार्गासाठी रूपये २ हजार २५० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. हे दोन प्रकल्प पर्यावणास पूरक असून इंधन व वेळेची बचत करणारे ठरणार आहेत. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तब्बल ७०४.२० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पांतर्गत ८८ कि.मी. लांबीच्या पाईप लाईनव्दारे मिरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये ४०३ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यापैकी १८५ दशलक्ष लिटर पाणी वसई-विरार तर २१८ दशलक्ष लिटर पाणी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रांना दररोज पुरवण्यात येणार आहे. सुर्या जलपुरवठा योजना अतिशय आगळी-वेगळी अशी आहे. इच्छित ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेमध्ये वीज किंवा त्या अनुषंगाने खर्च न करता गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करण्यात येणार आहे. महत्वपूर्ण प्रकल्पांना अर्थसंकल्पामध्ये प्राधिकरणाकडून प्राधान्य आणखीही काही महत्वपूर्ण प्रकल्पांना अर्थसंकल्पामध्ये प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. १८.२८ कि.मी. लांबीचा मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक पर्यंतचा दुसरा टप्पा प्राधिकरणातर्फे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने रूपये १५० कोटींची तरतूद केली आहे. मोनोरेल शिवाय इतर काही प्रकल्पांसाठी करण्यात आलेली तरतूद अशी – विस्तारीत मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्प (रू.८०० कोटी, भूसंपादनासह); मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (रू.५००.१० कोटी); मुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणा (रू.१४३ कोटी); सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्त्याचे कुर्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण तसेच वांद्रे-कुर्ला संकूल ते पश्चिम दृतगती महामार्गापर्यंत उन्नत मार्ग बांधणे (रू.१०० कोटी), पूर्व दृतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे उन्नत मार्ग सुधारणा करणे (रू.७५ कोटी); तसेच कलिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात पायाभूत सुविधा पुरविणे (रू.५४ कोटी).

हवामान