औरंगाबाद : पडेगाव येथील गोदामे पाडण्याची कारवाई सुरू

औरंगाबाद: पडेगाव येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकलच्या जागेवरील मांस विक्रेत्यांची गोदामे पाडण्याची कार्यवाही महापालिकेने शनिवारी सकाळीच सुरू केली. पडेगाव येथे महापालिकेने वीस वर्षांपूर्वी मांस विक्रेत्यांना गोदामासाठी भूखंड...औरंगाबाद: पडेगाव येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकलच्या जागेवरील मांस विक्रेत्यांची गोदामे पाडण्याची कार्यवाही महापालिकेने शनिवारी सकाळीच सुरू केली. पडेगाव येथे महापालिकेने वीस वर्षांपूर्वी मांस विक्रेत्यांना गोदामासाठी भूखंड दिले होते. त्यावेळी मास विक्रेत्यांनी ठरलेल्या रकमेपैकी काही रक्कम भरली. त्यानंतर मात्र उर्वरित रक्कम भरण्यात आली नाही. परिणामी हे भूखंड अजूनही महानगरपालिकेच्या जागेवर आहेत नावावर आहेत. दरम्यान शहरात कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर गतवर्षी महापालिकेने कांचनवाडी चिकलठाणा हरसुल आणि पडेगाव येथील जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले. परंतु पडेगाव येथे संबंधित जागेवर गोदामे उभी असल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाला होता. आता अखेर महापालिकेने शनिवारी सकाळीच पडेगाव येथे पाडापाडीची कार्यवाही सुरू करून जागा मोकळी करून घेण्यात घेण्यास सुरवात केली आहे. या मांस विक्रेत्यांना रोख मोबदला देण्यासाठी प्रशासनाने नुकताच स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला होता मात्र तो फेटाळून लावण्यात आला होता.

हवामान