• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


अर्ध्यापेक्षा जास्त 'जस्ट डायलची' भागीदारी मुकेश अंबानींची

रिलायंस रिटेलने जस्ट डायल मधील ६७ टक्के हिस्सा खरेदीची घोषणा केली असून रिलायंस रिटेलचे हे दुसरे मोठे अधिग्रहण आहे....



रिलायंस रिटेलने जस्ट डायल मधील ६७ टक्के हिस्सा खरेदीची घोषणा केली असून रिलायंस रिटेलचे हे दुसरे मोठे अधिग्रहण आहे. रिलायंस रिटेल जस्ट डायलच्या ६७ टक्के हिश्यासाठी ५२२२.८ कोटी रुपये देणार आहे. शुक्रवारी या संदर्भातील घोषणा केली गेली. रिलायंस उद्योगसमूहाचा रिलायंस रिटेल हा एक भाग आहे. जस्ट डायलची सुरवात व्हीएसएस मणी यांनी केली होती. त्यांचा व त्यांच्या परिवाराचा या उद्योगात ३५ टक्के हिस्सा असून त्यापैकी १५.६२ टक्के हिश्याची खरेदी रिलायंस रिटेल करणार आहे. त्यासाठी १३३६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर जस्ट डायलच्या अल्पसंख्य शेअरधारकांचा जास्तीचा २६ टक्के हिस्सा खरेदी केला जाणार आहे. त्यासाठी ओपन ऑफर आणली जाणार आहे. २५ वर्षापूर्वी जस्ट डायलची सुरवात झाली तेव्हा फक्त फोन आधारित सेवा दिली जात होती. २०१३ मध्ये ही कंपनी शेअर बाजारात सुचीबद्द झाली. त्यानंतर कंपनीचे मूल्य वाढून २ अब्जावर गेले होते पण तगडी स्पर्धा करावी लागल्याने ते घसरले. सध्या या कंपनीचे मूल्य ६६८३.७४ कोटी आहे. जस्ट डायल लोकल सर्च इंजिनवर आजही सर्वात मोठी कंपनी असून अनेक प्लॅटफॉर्मवर सरासरी तिमाही १५ कोटी युनिक व्हिजिटर्स आहेत. मोबाईल, अँप, वेबसाईट आणि ८८८८८८८८ हॉटलाईनचा त्यासाठी वापर केला जातो.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान