• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


मुंबईत गोवंडी येथे इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू

मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दहा जण जखमी...मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. अहिल्या बाई होळकर मार्गाला लागून असलेले हे दुमजली घर कोसळले. शिवाजी नगर, गोवंडी परिसरात १+१ स्ट्रक्चर असलेली इमारत पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. यातील ७ जणांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये तर तिघांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी यात अडकलेल्यांना बाहेर काढले सहा तास हे बचाव कार्य सुरू होते. हे बचाव कार्य आता संपले असले तरी मलबा काढण्याचे काम सध्या सुरू आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान