• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


७२ तासांच्या आत ॲपवर द्या नुकसानीची माहिती...!

प्रतिनिधी/औरंगाबाद : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे गारपीठ,ढगफुटी तसेच कुठे वीज पडल्याने आग...प्रतिनिधी/औरंगाबाद : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे गारपीठ,ढगफुटी तसेच कुठे वीज पडल्याने आग लागली असेल किंवा शेतात असेल तर यासंदर्भात विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी शेतकऱ्यांना या जोखमीच्या बाबीअंतर्गत शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडून लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे.अशा घटनांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत वैयक्तिकरीत्या मोबाइल ॲपद्वारे पीकविमा कंपनीला कळवावे असे आवाहन केले आहे. पाऊसामुळे अनेक ठिकाणी पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्या ठिकाणी अतिवृष्टी किंवा हवामान घटकांची प्रतिकूल परिस्थिती उद्‌भवली,पिकांचे नुकसान झाले असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवावे.तसेच अर्जाची एक आगावू प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास द्यावी, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास संपर्क साधावा. पिकाचे नुकसान कळवताना सर्व्हे नंबर, नुकसानीचे क्षेत्र तसेच पिकांचे फोटो आदीची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती पाठविण्यासाठी विमा कंपन्याचे टोल फ्री क्रमांक व इतर माहिती कृषी विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहे,असेही जाधव म्हणाले आपल्या आव्हानामध्ये म्हंटले आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान