• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


जिओ करणार एमजी हेक्टर सोबत भागीदारी

भारतातील आघाडीची कंपनी जिओ इंटरनेट ऑफ थिंग्स क्षेत्राकरिता सर्वोत्कृष्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी करणारी एमजी...



भारतातील आघाडीची कंपनी जिओ इंटरनेट ऑफ थिंग्स क्षेत्राकरिता सर्वोत्कृष्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी करणारी एमजी हेक्टर मोटर इंडियाने भागीदारीची घोषणा केली आहे. एमजी मोटर इंडियाने ऑटो-टेकमध्ये आघाडीचे स्थान मिळवत आगामी मिड-साईज एसयूव्हीमध्ये जिओच्या आयओटी सोल्युशन्सद्वारे आयटी सिस्टिमची सुविधा दिली जाईल.नव्या युगातील दमदार सोल्युशन्स या भागीदारीद्वारे कारनिर्माता प्रदान करेल. कंपनीचा उत्साह भविष्यातील मोबिलिटी अँप्लिकेशन्स आणि चमत्कारिक अनुभव देण्याचा यातून अधोरेखित होतो. जिओ या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम सेवा प्रदात्याने, विविध ग्राहक आणि उद्योग क्षेत्राला विविध सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेल्या ऑटोमोटिव्ह सोल्युशन्सला समर्थन देईल. एमजीच्या आगामी मिड-साइज एसयूव्ही ग्राहकांना केवळ मेट्रो शहरांमध्येच नव्हे तर लहान गावे व ग्रामीण भागातही, उच्च दर्जाच्या कनेक्टिव्हिटीसहह जिओच्या व्यापक इंटरनेट नेटवर्कचा फायदा होईल.या भागीदारीमुळे आमच्या पुढील मिड-साइज कनेक्टेड एसयूव्हीमध्ये तंत्रज्ञान आधारीत सुरक्षितता आणि चालकाचा अनुभव अधिक सहज मिळेल.जिओचे अध्यक्ष किरण थॉमस म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादने आणि सोल्युशन्सची इकोसिस्टिम भारतीय यूझर्ससाठी जिओ तयार करीत आहे. या प्रवासातील एमजी मोटर इंडियासोबतची भागीदारी ही महत्त्वाचा टप्पा आहे. जिओचे ईसिम, आयओटी आणि स्ट्रीमिंग सोल्युशन्सद्वारे एमजीच्या ग्राहकांना रिअल टाइम कनेक्टिव्हिटी, इन्फोटेनमेंट आणि टेलिमॅटिक्सची सुविधा मिळेल. वाहन क्षेत्रात नूतनाविष्काराद्वारे तंत्रज्ञान क्रांतीकरिता आमची वचनबद्धता असून तोच मुख्य आधारस्तंभ आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान