• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


पालक संघाची मागणी;आरटीईच्या प्रवेशाची चौकशी करा...!

प्रतिनिधी/औरंगाबाद : यंदाचा वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.तसेच औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ६०३ शाळा पात्र असून प्रवेश क्षमता ३ हजार ६२५ आहे.दरम्यान,कोरोना महामारीमुळे पालकांना निर्माण होत असलेल्या...प्रतिनिधी/औरंगाबाद : यंदाचा वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.तसेच औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेसाठी ६०३ शाळा पात्र असून प्रवेश क्षमता ३ हजार ६२५ आहे.दरम्यान,कोरोना महामारीमुळे पालकांना निर्माण होत असलेल्या अडचणींमुळे प्रवेशासाठी चार वेळा मुदत देण्यात आली होती.दरम्यान,आत्तापर्यंत २ हजार ४८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.तसेच आरटीईच्या ऍक्टनुसार 31 जुलैपर्यंत प्रवेश देता येत नसून दोन ऑगस्टला प्रवेश देणे बेकायदेशीर आहे. अशा आरटीओ एप्लीकेशन समोर नॉट अँप्रोच हे कारण किंवा कागदपत्र तपासणी करणाऱ्या समितीला बंधनकारक आहे.त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरटीई पालक संघाच्या वतीने केली जात आहे.कोणताही विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये म्हणून काम करणाऱ्या पालक संघाने दोन ऑगस्ट नंतर झालेल्या प्रवेशाबाबत चौकशी करावी अशी मागणी आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि शिक्षण विभागास केली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान