• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


राज्यशासनाच्या वतीने दिला जाणारा 'उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार' जाहीर ; राज्यतील विविध क्षेत्रातील वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान

महाराष्ट्रात पत्रकारितेत उत्कृष्ट करण्याऱ्या पत्रकारांना राज्यशासनाद्वारे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान...महाराष्ट्रात पत्रकारितेत उत्कृष्ट करण्याऱ्या पत्रकारांना राज्यशासनाद्वारे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान केला जातो. २०१९ वर्षासाठीचे राज्य शासनाच्यावतीने पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सोबतच राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले. पुरस्कार खालीलप्रमाणे : १. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप काळे, संपादक, दै.युथ सकाळ. मुंबई. २. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) अंजया अनपरती, विशेष प्रतिनिधी, दै. टाइम्स ऑफ इंडिया. नागपूर ३. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) झ्र राजन पारकर, वार्ताहर, दै. दोपहर का सामना. मुंबई ४. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) झ्र फरहान हनीफ, उपसंपादक, दै. उर्दू न्यूज, मुंबई. ५. यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) झ्र प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर. ६. पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)- वेदांत नेब, प्रतिनिधी, एबीपी माझा, मुंबई. ७. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- प्रशांत खरोटे, वरिष्ठ छायाचित्रकार, दै. लोकमत, नाशिक. ८. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर)- रोहीत कांबळे, छायाचित्रकार, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर. ९. सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)- राहुल झोटे, संपादक, सिंदखेड राजा मिरर.इन (वेब), बुलढाणा. १०. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)- प्रतिभा राजे, उपसंपादक, दै. पुढारी, सातारा. ११. पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार- रोहिणी खाडिलकर- पोतनीस, संपादक, दै. संध्याकाळ, मुंबई. (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.) १२. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- मनोज शेलार, वरिष्ठ उपसंपादक, दै. लोकमत, नंदुरबार, नाशिक. १३. अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह)- महेश जोशी, विशेष प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, औरंगाबाद. १४. आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकमत, मुंबई. १५. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग चैत्राली चांदोरकर, वरिष्ठ पत्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, पुणे १६. शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग झ्र हर्षद कशाळकर, जिल्हा प्रतिनिधी, दै. लोकसत्ता, रायगड. १७. ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग झ्र एकनाथ नाईक, उपसंपादक, दै. पुढारी, कोल्हापूर. १८. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग जयंत सोनोने, वार्ताहर, दै. दिव्य मराठी, अमरावती. १९. ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग योगेश पांडे, उपमुख्य उपसंपादक-वार्ताहर, दै. लोकमत, नागपूर. २०१९ च्या पुरस्कार निवडीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत पत्रकार नरेंद्र कोठेकर, विद्याधर चिंदरकर, रेनी अब्राहम, इंद्रकुमार जैन, शेख मोहम्मद अस्लम, रश्मी पुराणिक, रवींद्र आंबेकर, अशोक पानवलकर, अरुण कुलकर्णी, संचालक (माहिती) यांचा समावेश होता.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान