• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


'पुणे तिथे काय ऊने' पुण्यात कार्यकर्त्यानी बांधले चक्क मोदींचेच मंदिर

पुण्यातील एका मोदी समर्थकानी पंतप्रधान मोदींना देवाचा दर्जा देऊन चक्क मोदींचे मंदिर उभारले. मोदी विरोधी आधीच...पुण्यातील एका मोदी समर्थकानी पंतप्रधान मोदींना देवाचा दर्जा देऊन चक्क मोदींचे मंदिर उभारले. मोदी विरोधी आधीच समर्थकांना भक्त हि उपमा देत होते आता यामध्ये मोदी समर्थकांनी भक्त हि उपमा खरी ठरवली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा चर्चेचा विषय ठरले आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे.पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहेय याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च आलेला आहे. १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुण्यातील पहिले मंदिर आहे. परंतु देशपातळीवर देखील पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला आहे. मंदिरावरुन टीका केली तरी चालेल पण मोदींडकडून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून मंदिर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली.यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारले हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभारण्यात आल्याचे मुंडे म्हणाले. मंदिर उभारल्यानंतर अनेक जणांनी इथे गर्दी केली आहे. नरेंद्र मोदींचं व्यापक कार्य पाहून त्यांनी पुण्यातील औंध परिसरात स्वखर्चातून नरेंद्र मोदींचं मंदिर उभारलं आणि त्यामध्ये मोदींचा पुतळा देखील बसवला आहे. अशाप्रकारे त्यांनी नरेंद्र मोदींचा पुतळा बसल्यामुळे अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले आहे. नावारूपाला आल्यानंतर त्यांची ही दुसरी बाजू देखील समोर आली आहे. त्यामुळे आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात सहानुभूती मिळावी किंवा काही राजकीय फायदा करून घेण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं तर नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान