• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


गोळीबार आणि चाकूने वार करून सराफाला लुटले, कामगाराचा मृत्यू,.

वाशिम दि.२२: (अजय ढवळे) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील घटना..... योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे आपल्या दुकानातील व्यवसाय आटोपून घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटार सायकलवर आलेल्या सहा जणांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. मालेगाव ...वाशिम दि.२२: (अजय ढवळे) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील घटना..... योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे आपल्या दुकानातील व्यवसाय आटोपून घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटार सायकलवर आलेल्या सहा जणांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. मालेगाव शहरात एका ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला करून लुटण्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि चाकूने वार करून ज्वेलर्स मालकाला लुटले आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्स हे दुकान बंद करून योगेश अंजनकर आणि त्यांचा सहकारी रवी वाळेकर हे दोघे रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घरी जात होते. योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये योगेश अंजनकर यांचा सहकारी रवी वाळेकर यांचा चाकू व गोळी लागून मृत्यू झाला. तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.गंभीर जखमी झालेल्या रवी वाळेकर यांना वाशिम येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे तर योगेश अंजनकर यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अज्ञात चोरट्यांची मोटरसायकल घटनास्थळी आढळून आली. घटनास्थळी सापडलेली मोटार सायकल चोरीची असल्याचं समजते.


महत्वाच्या बातम्याहवामान