• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


केनस्टार तर्फे नवीन उत्पादनाचे अनावरण

केनस्टार या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या ग्राहक उपयोगी टिकाऊ ब्रँडने अलीकडेच दिनांक २७ डिसेंबर रोजी हॉटेल रामा...



केनस्टार या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या ग्राहक उपयोगी टिकाऊ ब्रँडने अलीकडेच दिनांक २७ डिसेंबर रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित व्यापार भागीदारां सोबतच्या बैठकीमध्ये एअरकुलर्सच्या सर्व नवीन उत्पाद्नाचे अनावरण केले. सर्व विहित कोविड प्रोटोकॉलचे पालन करत डीलर मीटचे उद्घाटन केन्स्टार्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील जैन यांच्यासह श्री. प्रदीप पांडा - व्यवसाय प्रमुख (दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र), केनस्टार, श्री. आदित्य सिंग चौहान - उत्पादन गट प्रमुख- केनस्टार, श्रीगणेश साबणे - प्रादेशिक व्यवस्थापक (पश्चिम २ प्रदेश) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केनस्टारने ग्लॅम स्मार्ट आणि सेन्सिओ असलेल्या एअर कूलर्सची सर्व नवीन स्मार्ट श्रेणीचे अनावरण केले, ग्लॅम स्मार्ट हे आयओटी आधारित टॉवर एअर कुलर आहे आणि ७ स्पीड कंट्रोल आणि आर्द्रता नियंत्रण यासारख्या वैशिष्ट्यांसह सेन्सिओ हा सर्वात सायलेंट एअर कूलर आहे. तसेच कुलर्सच्या डेझर्ट श्रेणीतील एअर कॉलरची नवीन श्रेणी प्रदर्शित केली आहे ज्यात टॉल बॉय, टर्बो कूल निओ कूल ब्लास्टर निओ ५१ आणि टॉलडे यासारख्या एअर कूलर्समधील नवीन मॉडेल्सचा समावेश आहे. हे कूलर रिमोट कंट्रोल, आर्द्रता नियंत्रण सेन्सर आणि इतर वैशिष्ट्यांनी युक्त आहेत आणि १२ लिटर ते १०५ लिटरपर्यंत विविध क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. केनस्टारकडे ६० पेक्षा जास्त कुलर्सची रेंज आहे जी त्यांच्या शैली, सौंदर्यशास्त्र आणि कूलिंग कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. केनस्टारचे श्री सुनील जैन यांनी सांगितले की केनस्टार येणाऱ्या वर्षा मध्ये सर्व श्रेणीचे उत्पादन, डीलर्सचे मजबूत नेटवर्क आणि मजबूत कामाच्या नितीमत्ते आधारे चांगला गतिमान व्यापार करेल अशी अपेक्षा आहे. श्री. प्रदीप पांडा यांनी व्यापार धोरणांची माहिती दिली, तसेच श्री. आदित्य सिंग चौहान यांनी केनस्टारच्या सर्व उत्पादनांची तांत्रिक सखोल माहिती दिली. या कार्यक्रमा प्रसंगी केनस्टारचे मराठवाडा विभागातील सर्व वितरक आणि विक्रेता यांची उपस्थिती होती.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान