• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'या' परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर...



जानेवारी महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जानेवारी, २०२२ मध्ये एमपीएससीमार्फत नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दोन जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ आता २३ जानेवारी रोजी हाणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ आता २९ जानेवारीला होणार आहे. आधी ही परीक्षा २२ जानेवारी रोजी होणार होती. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा २०२२, पेपर क्रमांक २, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा आता ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २९ जानेवारी रोजी होणार होती.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाया उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे उमेदरवारांच्या हिताचे राहील. असे परिपत्रक आयोगाने जाहीर केले आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान